Organ Donation | चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार नागरिकांनी घेतली अवयवदानाची प्रतिज्ञा

Chandrapur News | कलेक्टर, सीईओंनी घेतला अवयवदानाचा निर्णय, बैठकीतच केली ऑनलाईन नोंदणी
Chandrapur Organ Donation
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीही अवयवदानाचा निर्णय घेतला. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Chandrapur Organ Donation

चंद्रपूर : शासनाच्या निर्देशानुसार 3 ते 13 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभरात अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अवयवदान ही आजच्या काळातील सर्वोच्च मानवसेवा असून ती अनेकांना जीवनदान देऊ शकते, या भावनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीही अवयवदानाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित बैठकीदरम्यानच त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून प्रत्यक्ष कृतीतून या मोहिमेला पाठिंबा दर्शविला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

Chandrapur Organ Donation
चंद्रपूर हादरले! जमिनीच्या वादातून भावानेच भावाला गोळ्या घातल्या; दिवसाढवळ्या हत्याकांड

बैठकीत बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी सांगितले की, अवयवदानाविषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. या मोहिमेदरम्यान अवयवदानासंदर्भातील गैरसमज दूर करण्यात येतील. "आपण जगत असताना आणि मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडू शकतो. इच्छुकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी आणि आपल्या नातेवाईकांना तसेच परिचितांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करावे," असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.

मोहिमेतील आतापर्यंतचा प्रतिसाद जिल्हाभरात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 2114 नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली आहे. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत 1659 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत 455 जणांचा समावेश आहे.

Chandrapur Organ Donation
Chandrapur Tiger Death | चंद्रपूर वनविभागात खळबळ: सिंदेवाही तालुक्यात १५ वर्षांच्या वाघाचा मृतदेह आढळला

अवयवदानाची पात्रता व नियम सर्व वयोगटातील निरोगी व्यक्ती अवयवदानासाठी पात्र असतात. ब्रेन स्टेम, तीव्र हृदयविकाराचा झटका तसेच अकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अवयव दान करता येतात. मात्र, रेबीज, एचआयव्ही, हिपॅटायटीस, बुडून मृत्यू, कर्करोग किंवा सेप्सिसग्रस्त व्यक्तींचे अवयवदान करता येत नाही.

जर एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर अवयवदान करायचे असल्यास, कायद्यानुसार संमतीपत्र भरून त्यावर आपल्या जवळच्या नातेवाईकाची सही आवश्यक आहे. त्यानंतर संबंधितास डोनर कार्ड दिले जाते. तथापि, डोनर कार्ड असले तरी मृत्यूनंतर नातेवाईकांच्या अंतिम संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इच्छेविषयी कुटुंबीयांना पूर्वकल्पना असणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाईन संमतीपत्र भरण्याची सोय शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार https://notto.abdm.gov.in या संकेतस्थळावर अवयवदानाची ऑनलाईन संमती देता येते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त करता येते. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढविण्यासोबतच अनेकांना नवे जीवनदान देण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news