चंद्रपूर : कोरपना येथील एका खासगी कॉन्व्हेंट शाळेतील 11 वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी शिक्षक अमोल लोडे याला मंगळवारी (दि.1)स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यासोबतच संशयिताची युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरपना येथील एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडीतेने कोरपना पोलिसात दाखल केली. पिडीता शाळेत वर्ग सुरु असताना संशियत आरोपी शिक्षक तिला कार्यालयात घेऊन गेला. कार्यालयात कुणीच नसल्याची संधी साधत पिडीतेला गुंगीचे औषध खाण्यास दिले. मात्र तिने खाण्यास नका दिल्याने रागावून तिला खायला लावले. यानंतर पीडितेने त्यापैकी एक गोळी फेकून दिली तर एक गोळी खाल्ली. त्यानंतर कार्यालयातच नराधम शिक्षकाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर शिक्षकाने या घटनेची माहिती पालकाला दिल्यास पिडीतेच्या कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी अल्पवयीन पिडीतेने सदर घटना घरी सांगितले नाही. मात्र आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीनी या घटनेची माहिती पिडीतेच्या आईला सांगितली.
त्यांनतार पिडितेच्या आईने मुलीला ह्या घटनेची विचारपूस केल्यांनतरतिने सर्व हकीकत सांगितली. पीडितेने काल मंगळवारी पालकासह कोरपना पोलिसात येऊन या घटनेची तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी शिक्षक अमोल लोडे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक करण्कयात आली. या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोरपना शहर कडकडत बंद पाळण्यात आला. निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये नारिकांसह चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. आज प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कोरपना येथे शाळेला भेट दिली. या घटनेची चौकशी केली. उद्या कोरपना येथे सर्व पक्षीय तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. युवक काँगेसचे जिल्हाध्यक्ष संतनू धोटे यांनी संशयित आरोपी अमोल लोडे याची कोरपना युवक काँग्रेस शहर अध्यक्ष्पदावरून हकालपट्टी केली आहे.