सातारा : वृद्धाचा चिमुरडीवर अत्याचार

खटाव तालुक्यातील संतापजनक घटना; नराधमाला कोठडी
Child abuse incident
चिमुरडीवर अत्याचारPudhari File Photo
Published on
Updated on

मायणी : खटाव तालुक्यातील एका गावात दुसरीमध्ये शिकत असलेल्या चिमुरडीवर वृद्धाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. नराधम संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.

Child abuse incident
लग्न लावून देणार असल्याचे खोटे सांगून पंधरा वर्षीय मुलीवर केले अत्याचार

दिलीप हरिबा जाधव (वय 63, रा. औतरवाडी, ता. खटाव) असे संशयिताचे नाव आहे. पीडित चिमुरडी खटाव तालुक्यातील एका गावात दुसरीमध्ये शिकत आहे. संबंधित मुलीला घेऊन तिची आई शाळेत निघाली होती. यादरम्यान वाटेतच संशयित जाधव भेटला. त्याने आपण शाळेकडेच निघालो आहे, असे सांगून मुलीला आपल्या दुचाकीवरून नेले; पण तो शाळेत पोहोचण्याऐवजी मुलीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याने तिथे तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीला दुसर्‍या दिवशी त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात उपचारांसाठी नेले असता तिने सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मायणी पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलीप जाधव याच्यावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहेत.

संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा

संशयित दिलीप जाधव याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात 2008 साली खुनाचा गुन्हा, तर विटा पोलिस ठाण्यात चोरी व महिलांची छेडछाड काढल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. जाधव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने त्याला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.

Child abuse incident
Mumbai News | १५ वर्षांच्या मुलीवर प्रियकरासह तिघांकडून लैंगिक अत्याचार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news