लग्न लावून देणार असल्याचे खोटे सांगून पंधरा वर्षीय मुलीवर केले अत्याचार

लग्न लावून देणार असल्याचे खोटे सांगून पंधरा वर्षीय मुलीवर केले अत्याचार
Crime News
लग्न लावून देणार असल्याचे खोटे सांगून पंधरा वर्षीय मुलीवर केले अत्याचारfile photo
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तुझे आई वडील माझ्यासोबत लग्न लावून देणार असल्याचे खोटे सांगून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. २८) उघडकीस आली आहे. पैठण पोलिसांनी सदरील नराधम तरुणाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गहीनीनाथ बाजीराव गर्जे (रा. शेकापूर ता. आष्टी, जिल्हा बीड) असे आरोपीचे नाव आहे.

याविषयी पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी गहिनीनाथ गर्जे याने तू मला फार आवडते. तुझे आई-वडील माझ्यासोबत तूझे लग्न लावून देणार आहेत. असे खोटे सांगून सदरील अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या राहत्या घरी २० ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या दरम्यान अत्याचार केले. हा प्रकार माहिती होताच मुलीच्या नातेवाईकांनी शनिवारी पैठण पोलीस ठाण्यात धाव घेत गहिनीनाथ गर्जे याच्याविरुद्ध तक्रार दिली.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे करीत आहेत.

Crime News
सांगली : सातवीतील मुलीवर अत्याचार करून केले लग्न

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news