चंद्रपूर : चिमूरात माजी मंत्री मोघे यांच्या विरोधात माना समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा | पुढारी

चंद्रपूर : चिमूरात माजी मंत्री मोघे यांच्या विरोधात माना समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमातीबाबत नागपूर येथे असंवैधानिक वक्तव्य केले होते. त्याच्या निषेर्धात आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, माना आदिम जमात मंडळ आणि समन्व समितीच्या वतीने आज (दि.८ ऑक्टोबर) माना समाजाने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.

विदर्भातील जिल्ह्यामध्ये माना जमात मोठ्या संख्येत वास्तव्यास असून “माना” ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. तिची स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये माना हि जमात क्रमांक १८ वर नमूद आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगांनी “माना” जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केलेले आहे. मात्र नागपूर येथील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत असंवैधानिक वक्तव्य केले.

माना जमातीबाबत वारंवार चुकीचे वक्तव्य करून द्वेष भावना आणि आकसापोटी माना जमातीचा अवमान केला जात आहे. त्यामुळे जमाती जमातीत तेढ निर्माण करून अशांतता व संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आज चिमूर तालुक्यातील माना समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढला.

चिमुरातील अंभ्यंकर मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. हुतात्मांना अभिवादन करून निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माना समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भाषणातून माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्या वक्त्याच्या जाहीर निषेध केला. व भविष्यात माना जमातीचे विरोधात वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र लढा देण्यात येईल. यासाठी शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा दिला. त्यांनतर प्रतिनिधी शिष्टमंडळांनी अप्परजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

हेही वाचा :

Back to top button