

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातील जंगलात कुंपनाला काठ्या आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आज (दि.8) सकाळी घडली. नीलकंठ नारायण नन्नावरे (वय 59, रा. मोहर्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नीलकंठ नन्नावरे व अडकू जेंघठे शेतातील कुंपण करण्यासाठी काठ्या आणण्यास मोहर्ली जंगलात गेले होते. काठ्या काढत असताना नीलकंठ यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांना सुमारे ५० मीटर अंतरावर फरफटत नेले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या अडकू यांनी गावात येऊन या घटनेची माहिती ग्रामस्थांना व मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
हेही वाचा :