

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील येरवडा येथील ब्रह्मा सनसिटी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका सात वर्षाच्या मुलावर गंभीर हल्ला केला. अनिरुद्ध जोंधळे हा कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.