चंद्रपूर : वरोऱ्यातील महावितरणचा अभियंता लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर : वरोऱ्यातील महावितरणचा अभियंता लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मीटरचे डिमांड काढून देण्यासाठी पैशाची मागणी करण्याऱ्या महावितरणच्या वरोरा येथील सहायक अभियंत्याला ६ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.२७) केली. सहायक अभियंता श्रीणु बाबू चुक्का असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वरोरा येथील रहिवासी असून, सोलर सिस्टीम फिटिंग व इलेकट्रीशनचे काम करतो. तक्रारदार यांनी ग्राहकांच्या घरी (सोलर सिस्टम) किट लावण्याचे काम घेतले होते. त्यासाठी लागणारे डिमांड काढून देण्याच्या नावाखाली लाचखोर अधिकारी श्रीणु बाबू चुक्का यांनी २४ जून रोजी तक्रारदार यांच्याकडे ६ हजार रुपयांची मागणी केली होती. वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर) राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर) मधुकर गीते तसेच पोलीस उपाधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा भरडे, सहकारी नरेश नन्नावरे, रवीकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतीश सिडाम यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news