चंद्रपूर : शेतात काम करीत असताना वीज पडून महिलेचा मृत्यू

वीज
वीज
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भद्रावती तालुक्यातील कोंढा येथे शेतात काम करीत असताना वीज पडून महिला ठार झाल्याची घटना घडली. गुरूवारी (१ सप्टेंबर) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वर्षा ओंकार मंगाम (वय ३४ रा. कोंढा) असे मृत महिलेचे नाव आहे.

गुरूवारी वर्षा मंगाम या पतीसह शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस सूरू असतानाच मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट सुरू झाला. यावेळी आपल्या पतीसोबत शेतात काम करीत असलेल्या वर्षा यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची भद्रावती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृत महिलेच्या पश्चात पती, सासरे, सासू, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे. या महिलेच्या मृत्यूने कोंढा गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news