नागपूर: ‘सी 20’ गटामुळे ‘जी 20’ गटाची कार्यकक्षा विस्तारली; कार्यकारी समितीच्या बैठकीत दावा

नागपूर: ‘सी 20’ गटामुळे ‘जी 20’ गटाची कार्यकक्षा विस्तारली; कार्यकारी समितीच्या बैठकीत दावा
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : सी 20 इंडिया गटामुळे (सी 20) जी 20 गटाची कार्यकक्षा विस्तारली असून सामाजिक मुद्द्यांचा समावेश होण्यास मोलाची मदत झाली आहे. असे नागपुरात झालेल्या कार्यकारी समितीच्या आज (दि.२०) बैठकीत सांगण्यात आले. सिव्हील 20 इंडिया 2023 गटाच्या (सी २०) कार्यकारी समितीची बैठक रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला सिव्हील 20 इंडिया 2023 गटाच्या सुकाणू समितीचे सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि सिव्हिल 20  इंडिया 2023 गटाचे कार्यकारी गट समन्वयक तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सिव्हिल 20 इंडिया गटसचिवालयाचे आश्रयदाते प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये भारतातल्या अमृता विद्यापीठमचे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद, सेवानिवृत्त भारतीय राजदूत आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 चे शेर्पा विजय के. नांबियार, निवेदिता भिडे, विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे,  ब्राझीलमधील गेस्टॉस(GESTOS) आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 च्या ट्रोइका सदस्य अलेस्सांद्रो नीलो,, मार्टिन रेचर्ट्स, लक्झेंबर्गच्या रायझिंग फ्लेम्सच्या सह-संस्थापक आणि संचालक आणि माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस निधी गोयल, सिव्हिल 20 इंडिया 2023 शेर्पा आह मफ्तुचन आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 चे उप शेर्पा स्वदेश सिंग आणि किरण डीएम उपस्थित होते.

याशिवाय आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशिएटिव्हचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. अँडी कार्मोन, एशियन डेव्हलपमेंट अलायन्सचे प्रादेशिक समन्वयक ज्योत्स्ना मोहन,द प्रकार्सा, इंडोनेशियाचे बिन्नी बुचोरी, एड्स हेल्थकेअर फाउंडेशन ग्लोबल ऍडव्होकसी आणि पॉलिसीचे संचालक गिलरमिना अलानिझ, इटली महासचिव रिकार्डो मोरो, अबॉन्ग ब्राझीलचे पेड्रो बोका, सेवा इंटरनॅशनलचे ग्लोबल समन्वयक, श्याम परांडे, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शशी बाला यांचा समावेश होता.  भारताच्या सी -20 चे शेरपा अह माफ्तुचान यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले. सामाजिकसोबतच सी 20 या गटाकडून तांत्रिक आणि राजकीयदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकतील अशा ठोस शिफारशी यायला हव्यात, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीत झालेल्या खुल्या चर्चेत उपस्थितांनीही  सी 20 इंडिया कार्यकारी गटाशी संबंधित उपक्रम आणि संकल्पना मसुद्याविषयी सूचना आणि शिफारशी मांडल्या. प्रारंभी विजय नांबियार यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले.

अध्यात्म जीवनाचा अविभाज्य भाग-स्वामी अमृतस्वरूपानंद

वेळ, प्रयत्न आणि परमेश्वराची आराधना या बाबी आपल्या जगण्याचे सर्वात महत्वाचे अंग असल्याचे सांगून स्वामी अमृतस्वरूपानंद म्हणाले, अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सरकारने तळागाळातील  सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांच्या माध्यमातून याच तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news