Drowning incident : खदाणीच्या पाण्यात दोन मुले बुडाली; कोराडी धरणाजवळील दु:खद घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
Drowning
Drowning Pudhari
Published on
Updated on

बुलढाणा : धरण पहायला गेलेले दोघे मावसभाऊ पाय धुण्यासाठी खदाणीच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत बुडून त्यांचा करूण अंत झाला. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावाजवळील कोराडी धरणाजवळ शनिवारी (दि.८) सायंकाळी ५.३०वाजताच्या सुमारास ही दु:खद घटना घडली. यामुळे देऊळगाव माळी परिसरात वातावरण शोकाकुल झाले.

Drowning
Farmer Drowning Incident: शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू; बाहदराबाद गावावर शोककळा

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शोधमोहीमेत आयान राजू शेख (वय: १० वर्षे) या मुलाचे शव सापडले आहे. या घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी देऊळगाव माजी येथील आयान राजू शेख व त्याचा मावसभाऊ आवेद इब्राहिम शेख (११,रा.लोणार) हे दोघे शेख आसिफ शेख हुसैन यांच्यासोबत गावाजवळील कोराडी धरणावर गेले होते. धरणाच्या लगतच असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीजवळ जमिनीच्या समतल दिसत असलेल्या पाण्यात आयान व आवेद हे दोघे पाय धुण्यासाठी गेले. ती खदानीची जागा असून पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे व १५०फूट खोल ४५फूट लांब आहे.

Drowning
Ratnagiri Drowning Incident : रत्‍नागिरीत पोहायला गेलेल्‍या मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्‍यू

याबाबत अनभिज्ञ असलेली ही मुले बेमालूमपणे पाण्यात उतरली आणि क्षणातच खोलवर पाण्यात बुडाली. हे लक्षात येताच हलकल्लोळ झाला. त्यांना वाचवण्यासाठी आसपासचे लोक धावले पण तोवर उशिर झाला होता.बुडालेल्या दोन्ही मुलांना शोधण्याची मोहिम पोलीस, स्थानिक प्रशासन व धाडसी तरुणांनी राबवली. रात्री उशिरापर्यंत आयानचे शव हाती लागले. आवेदला शोधण्याची मोहीम आज रविवार सकाळपासून राबवली जाणार आहे. धरणाजवळ खोलवर असलेल्या व पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीजवळ सुरक्षा कठडे किंवा धोक्याची कोणतीही सुचना नसल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news