नांदूरा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टिप्पर मालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

संशयित आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Nanded Crime News
नांदूरा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टिप्पर मालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. File Photo
Published on
Updated on

The police arrested the tipper owner who carried out a life-threatening attack on the Nandura Tehsildar

बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा टिप्पर जप्त केल्याच्या रागातून नांदूरा येथील तहसिलदारांच्या कक्षात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या टिप्पर मालकाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी समाधान मोरे (५२ रा.बुलढाणा) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nanded Crime News
Buldhana Crime News : 'चिल्ड्रेन बँक'च्या नोटांनी फसवणूक करणारी टोळी जेरबंद; पोलिसांवर चाकू हल्ला

याबाबत एसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नांदू-याचे तहसिलदार अजितराव जंगम यांनी गौनखनिजाची अवैध वाहतूक करणारे समाधान मोरे याच्या मालकीचे टिप्पर (क्र.एमएच२८-एबी ७६३८) वर जप्तीची कारवाई केली होती. याचा राग मनात ठेवून मोरे याने २३ एप्रिलच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास तहसिलदार जंगम हे त्यांच्या कक्षात कार्यालयीन कामकाज करीत असतांना तहसिलदारांच्या कक्षात घुसला.

यावेळी मोरे याने तहसिलदार जंगम यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करुन, मारहाण करून त्यांचा शर्ट फाडला व लोटपोट करून जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून एका वाहनाने पसार झाला.

Nanded Crime News
Murder case Nanded : नांदेड गँगवार हत्याकांडातील आरोपींना वाराणसीत बेड्या!

अचानक झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे तहसिलदारांच्या कार्यालयात खळबळ उडाली. तक्रारीवरून नांदूरा पोलिसांनी संशयित आरोपी समाधान मोरे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्याकडे तपास सोपवला.

याकामी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली. संशयित आरोपी समाधान मोरे हा साखरखेर्डा परिसरातील सावंगी भगत गावात लपून राहिल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने मोरे याला शिताफीने जेरबंद केले व त्यांच्या ताब्यातून स्टीलचा एक चाकू व एक कोयता आणि विना नंबरची एक क्रेटा कार हस्तगत केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news