Murder case Nanded : नांदेड गँगवार हत्याकांडातील आरोपींना वाराणसीत बेड्या!

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; पळून जाण्याच्या तयारीत असतानाच दोघांना अटक
Murder case Nanded
गँगवार हत्याकांडातील अटक करण्यात आलेले आरोपी व पोलिस पथक.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील कॅनल रोडवर अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गँगवॉर मधून तीन अर्जितसिंग चव्हाण याच्यासह तीन जणांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्याचे साथीदार पोलिसांना सतत हुलकावणी देत होते.

अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि वाराणसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. साईलाला शरण आल्याच्या अफवांना या कारवाईने पूर्णविराम मिळाला असून, पळून जाण्याच्या तयारीत असतानाच साईलालाला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.

Murder case Nanded
शिरसवाडी हादरली! पार्टीनंतर गाढ झोपेत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून; संशयित आरोपी जेरबंद

नांदेड मधील साई लाला व सदा गँग मध्ये वर्चस्व वादातून 4 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 1.10 ते 1.30 च्या दरम्यान कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात साईलाला गँगकडून सदा गँग च्या अर्जित सिंग चव्हाण याच्यावर चाकू आणि तलवारीने भीषण हल्ला करण्यात आला होता. या रक्तरंजित हल्ल्यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे व अटकेचे आदेश दिले होते.

गुन्हा घडल्यापासून साईलाला गँगचा प्रमुख साईलाला दीपकसिंग गहेरवार (वय 26) आणि नितेश परमेश्वर इंगळे (वय 22) हे फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सोलापूर आणि पुण्यासह अनेक ठिकाणी पथके रवाना केली होती. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी वाराणसीमध्ये दडून बसले आहेत.स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपींनी मोबाईल बंद ठेवले होते, मात्र तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी त्यांचे अचूक लोकेशन शोधून काढले.

Murder case Nanded
Sinnar Murder News | सिन्नर हादरला! पार्टीच्या बहाण्याने मित्राची हत्या; पास्ते घाटातील अनोळखी मृतदेह प्रकरणाचा छडा

पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला अटक

आरोपी वाराणसीतूनही पोबारा करण्याच्या तयारीत असतानाच, नांदेड पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. 22 एप्रिल रोजी साईलाला आणि नितेश इंगळे यांना झडप घालून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर आरोपीने आत्मसमर्पण केल्याची चर्चा रंगली होती, परंतु पोलिसांनी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट करत, ही कारवाई पोलिसांच्या कौशल्यामुळेच यशस्वी झाल्याचे सांगितले.

टीमचे विशेष कौतुक

अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील भिसे, ब्रम्हानंद लामतुरे, शिलराज ढवळे, प्रदीप गर्दनमारे, राजू बुंगई, व्यंकट गंगुलवार, हॅमत बिचकेवार तसेच सायबर सेलच्या राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांनी ही कामगिरी फत्ते केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news