दुष्काळी अनुदानासाठी संमतीपत्रे तातडीने जमा करा

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
buldhana news
दुष्काळी अनुदानासाठी संमतीपत्रे तातडीने जमा कराfile photo
Published on: 
Updated on: 

Submit consent forms for drought relief grants immediately

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळ अग्रिम अनुदानांतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळणारे पाच हजार रुपयांचे अनुदान लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, यासाठी सामूहिक खातेदार शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे तातडीने भरून संबंधित तलाठ्यांकडे जमा करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

buldhana news
Hingoli News : हंगाम संपत आल्यावर टोकाईच्या बॉयलरचा धूर

सिंदखेडराजा व देऊळगाव राजा उपविभागातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळी अनुदान वितरणातील अडचणी, ग्रीस्टॅक नोंदणी, नवीन विहीर खोदकाम परवानगी, पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच महसूल विभागातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरू शकते. मात्र, सामूहिक खातेदारांच्या संमतीपत्रांअभावी काही प्रकरणांमध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.

buldhana news
Hingoli News : पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंगोलीचा डंका

त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रांची पूर्तता करून ती तलाठी कार्यालयात जमा करावीत, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येईल, असे प्रा. खडसे यांनी स्पष्ट केले.या बैठकीस प्रभारी तहसीलदार प्रवीण वहहऱ्हाडे, तहसीलदार प्रमोद खामाट, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, भगवान कछवे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.