Hingoli News : हंगाम संपत आल्यावर टोकाईच्या बॉयलरचा धूर

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम अखेर १७ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
Hingoli News
Hingoli News : हंगाम संपत आल्यावर टोकाईच्या बॉयलरचा धूरfile photo
Published on: 
Updated on: 

The current crushing season at the Tokai Cooperative Sugar Factory in Vasmat taluka has finally commenced, effective November 17

गिरगाव : पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम अखेर १७ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. गळीत हंगामाचा सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा आणि जवळपास अर्धा हंगाम संपत आल्यानंतर कारखान्याचा बॉयलर पेटल्याने उशिरा का होईना गव्हाणीत ऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कारखाना सुरू झाला असला तरी ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडून कोणतीही आवश्यक यंत्रणा आणि नियोजन नसल्याने बळीराजाला स्वतःता ऊस तोड करून कारखान्यांला ऊस देण्याची वेळ येणार आहे.

Hingoli News
Hingoli News: आकोलीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; हप्ता बंद झाल्याने कारवाई झाली का? गावकऱ्यांचा सवाल

हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्याची देखभाल-दुरुस्ती, यंत्रसामग्रीची चाचणी आणि तोडणी यंत्रणा सज्ज ठेवणे अपेक्षित असते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या हंगामात टोकाई कारखान्याचा कारभार सुरुवातीपासूनच ढेपाळल्याचे चित्र आहे. इतर पाहायला मिळते कारखान्यांनी गळीत हंगामाला वेग घेतलेला असतानाच, टोकाई कारखान्याचा बॉयलर पेटण्यास मोठा विलंब झाला.

यामुळे हंगामातील निम्मा काळ वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे आणि त्यात कारखाना सुरू झाला असला तरी पुरेशा प्रमाणात ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूक यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतातील उभा ऊस वेळेवर गाळपासाठी कसा न्यायचा, अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावते आहे. ऊस नोंदणी, तोडणीचे वेळापत्रक आणि यंत्रणेचे योग्य संकलन नसल्याने कारखान्याच्या प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Hingoli News
Electricity Supply : शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीजपुरवठा

टोकाई परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस पिकवला आहे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने आधीच वेळापत्रक कोलमडले असून आता तोडणी यंत्रणेअभावी ऊस शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात अगोदरच यावर्षी पाऊस झाला नसल्याने पाणी पातळी कमी झाली आहे तर ऊस उशिरा तोडणी झाल्यास उसाचे वजन घटणे आणि पुढील पिकांचे नियोजन बिघडणे यांसारख्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.

शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोड करून कारखान्यांला ऊस द्यावा त्या तोडीचे पेमेंट आम्ही नेट काट्यावर देऊत तसेच यावर्षीचा ऊसाचा दर हा पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्यात येईल व पुढील दर हा एफ आर पी प्रमाणे देण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक गायकवाड यांनी सांगितले.

बॉयलरचा धूर निघाला याचा आनंद असला, तरी तोडणीची यंत्रणाच नसल्यास आमचा ऊस गाळपाला कसा जाणार? तसेच पश्चिम महाराष्ट्र ४ हजार २०० दर आणि टोकाईने ३ हजार रुपये जाहीर केला. मराठवाड्यातील ऊस काय गोड नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे तसेच कारखाना प्रशासनाने तातडीने तोडणी यंत्रणा कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ऊसउत्पादक शेतकरी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.