Hingoli News : पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंगोलीचा डंका

सीईओंच्या सादरीकरणातून मांडला गाव विकासाचा प्रवास
Hingoli News
Hingoli News : पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंगोलीचा डंकाfile photo
Published on: 
Updated on: 

Hingoli shines at the award distribution ceremony

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांत छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यात गुरुवारी दाटेगाव ग्रामपंचायतीला तब्बल एक कोटींचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या सादरीकरणातून गाव विकासाचा प्रवास मांडण्यात आला, गावाचा झालेला कायापालट पाहून उपस्थित मंत्री व लोकप्रतिनिधींनी अधिकारी अन गावकऱ्यांचे कौतुक केले.

Hingoli News
Electricity Supply : शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीजपुरवठा

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अभियानात प्रथम पुरस्कार मिळविलेल्या हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार उपस्थितांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, समृध्दी दिवाणे, विजय बोराटे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम आडे, सरपंच माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला.

Hingoli News
Illegal Sand Extraction : जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडली

यावेळी गोरे यांनी या अभियानातील पुरस्कारांसाठी ग्रामपंचायतींच्या कामांचे निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यात आले. प्रत्येक गावातील कामांची तीन वेळा तपासणी करण्यात आल्याचे सांगत गाव समृद्ध करण्याचे आवाहन केले. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अभियान यशस्वी करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अभियानाच्या अंमलबजावणीचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यामध्ये अभियानाच्या माध्यमातून गावांनी कसा कायापालट केला याची माहिती दिली. तर दाटेगाव ग्रामपंचायतीची अभियानापूर्वीची परिस्थिती व अभियानाच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या परिस्थितीतीच माहिती देत गावाने आमूलाग्र बदल केल्याचे सांगितले. नवीन टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून या सर्व ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचे मोठे बदल दिसतील असे आश्वासन त्यांनी दिले.

सादरीकरणातून दाटेगाव ग्रामपंचायतीने केलेला प्रवास उलगडून दाखविला. गावपातळीवर झालेले बदल व गाव विकास पाहून उपस्थित मंत्री व लोकप्रतिनिधींनी अधिकारी व गावकऱ्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.