बुलढाणा : अवैध गर्भलिंग निदान करतांना सोनोग्राफी केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले

मेहकर शहरात पीसीपीएनडीटीची कारवाई
illegal gender diagnosis
अवैध गर्भलिंग निदान करतांना सोनोग्राफी केंद्र चालकाला रंगेहाथ पकडलेPudhari File Photo
Published on
Updated on

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या गर्भलिंग निदान करतांना मेहकर शहरातील एका सोनोग्राफी केंद्र चालकाला पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. शनिवारी (दि.3) दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मेहकर शहरात केलेल्या या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गर्भलिंग निदानामुळे मुलींचा जन्मदर घटल्याचे भीषण परिणाम समोर दिसत असूनही गंभीर शिक्षेची तरतूद असूनही पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी गर्भलिंगनिदानाचे गोरखधंदे चोरीछिपे सुरू असल्याचे बिंग या कारवाईने फुटले आहे.

illegal gender diagnosis
कोल्हापूर : गर्भलिंग निदान टोळीचा सूत्रधार डॉक्टर, साथीदार सराईत गुन्हेगार

किसन गरड पाटील असे या कारवाईतील आरोपीचे नाव आहे. औषधी आणि वैद्यकीय उपकरणे विक्रीचा व्यवसाय करणारा किसन गरड हा रेडिओलाजिस्ट डॉक्टर नसूनही त्याने मेहकर शहरातील जिजाऊ चौकातील एका संकूलात "निदान सोनोग्राफी सेंटर" थाटले आहे.त्याचेकडे दोन सोनोग्राफी यंत्रे आहेत. गर्भलिंग निदानासाठी इच्छूक असलेल्या विवाहित जोडप्यांना हेरायचे, मोठी रक्कम उकळून त्यांना मेहकर शहरातील पवनसूत नगरात भाड्याने घेतलेल्या दोन रुमवर बोलवायचे आणि पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने तपासणी करुन मुलगा की मुलगी? निदान सांगायचे. असा त्याचा अवैध धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती कळल्यावरून पीसीपीएनडीटी पथकाने एका गर्भवती महिलेला डमी ग्राहक म्हणून किसन गरड याच्याकडे सोनोग्राफी तपासणीसाठी पाठवले.

illegal gender diagnosis
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणारे चौघे गजाआड, दोघे फरार

शनिवारी (दि.3) दुपारी १ वाजता भाड्याने घेतलेल्या रुमवर तपासणीला बोलावले. महिलेची गर्भलिंग सोनोग्राफी केली आणि गर्भात मुलगा असल्याचे निदान सांगितले. त्याचवेळी आसपास दबा धरून बसलेल्या पीसीपीएनडीटीच्या पथकाने छापा टाकून आरोपी किसन गरड याला ताब्यात घेऊन कारवाई केली. वैद्यकीय अधिकारी,वकील व पोलीस या पथकात सहभागी होते. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सुनील कडासने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news