Samruddhi Highway Car Accident | समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; दांपत्याचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा परिसरात भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक
Buldhana Kingaon Raja Road Mishap
अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान Pudhari
Published on
Updated on

Buldhana Kingaon Raja Road Mishap

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर मंगळवारी (दि. २३) पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा परिसरात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले आणि कारचालक गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय ५२) हे आपल्या कुटुंबासह कार (एमएच २० एचएन ६७६८) मधून नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. पहाटे सुमारे ६.१५ वाजता समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३२६.५ जवळ लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला (एनएल ०१ एडी ४९८१) त्यांच्या भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

Buldhana Kingaon Raja Road Mishap
Samruddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर कारची कंटेनरला धडक : ४ जण गंभीर जखमी

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर आणि त्यांच्या पत्नी गुलसितानबी सय्यद (वय ४५) यांचा गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, त्यांची मुलगी नबा सय्यद आसिफ (वय १८), मुलगा सय्यद अजब वाज सय्यद आसिफ (वय २५) आणि कारचालक शेख साजिद शेख फरीद (वय ३६) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले.

Buldhana Kingaon Raja Road Mishap
Samruddhi Highway Block : 'समृद्धी'वर ७ फेब्रुवारीपासून ट्रॅफिक ब्लॉक; वाशिम-बुलढाणा टप्प्यात ३५ वेळा वाहतूक थांबणार

ट्रकचालक मोहम्मद इसरार (रा. झारखंड) यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र आणि सिंदखेडराजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील सोळंके यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. किनगाव राजा पोलिस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news