Samruddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर कारची कंटेनरला धडक : ४ जण गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यातील नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २१८+३०० येथे अपघात
Samruddhi Mahamarg car accident news
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात कारचा झालेला चुराडा Pudhari
Published on
Updated on

Samruddhi Mahamarg car accident news

वाशिम: जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले, तर एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. २०) सकाळी सुमारे ७:३७ वाजण्याच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २१८+३०० येथे झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असलेली (MH 47 BZ 2242) कार समोर असलेल्या (HR 55 AQ 9358) कंटेनरला मागून जोरदार धडकली. या धडकेत कारचा चुराडा झाला. अपघातात कार चालक राजेश मेघनाथ हरिजन (वय ३४, रा. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) यांच्यासह इतर तीन सहप्रवासी गंभीर जखमी झाले, तर एक सहप्रवासी किरकोळ जखमी झाला.

Samruddhi Mahamarg car accident news
Washim Accident | वाशिम शहरात ‘थार’चा थरार: ७ वाहनांना चिरडले; ४ जण गंभीर जखमी

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र अमानी येथील अधिकारी व कर्मचारी, तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रग्णवाहिकेने वाशिम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अपघातानंतर धडक दिलेला कंटेनर घटनास्थळावरून निघून गेला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सकाळी ९:२० वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news