Lok sabha Election 2024 Results : बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी

बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी
बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील एकूण ११ लाख ४५३३ मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या आटोपल्या आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हे २९, ३७६ मतांची आघाडी घेऊन सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांना ३,४८,२३८ तर महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना ३,१८,८६२ मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना २,४८,९७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांना ९८,०९२ मते मिळाली. २००९ पासून प्रतापराव जाधव हे शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. परंतु, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असे चित्र सर्वत्र होतेय. या अटीतटीच्या लढाईत जाधव यांनी मोठा विजय मिळवला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news