Lok sabha Election 2024 Results : रक्षा खडसेंची हॅट्रिक, स्मिता वाघ यांनीही रोवला विजयाचा झेंडा!

Lok sabha Election 2024 Results : रक्षा खडसेंची हॅट्रिक, स्मिता वाघ यांनीही रोवला विजयाचा झेंडा!

जळगांव, नरेंद्र पाटील– जिल्ह्यातील जळगाव रावेर लोकसभेमध्ये काट्याची टक्कर होणार असे चित्र दिसत होते मात्र मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासूनच भाजपाच्या जळगाव व रावेर लोकसभेतील उमेदवारांनी आपली आघाडी कायम ठेवत विजयाचा पल्ला गाठला. रावेर लोकसभेमध्ये मतदारांनी खडसेंवर विश्वास दाखविला त्यामुळे तिसरी टर्म सुनबाई रक्षा खडसे पार झाली. तर जळगाव लोकसभेमध्ये झालेल्या उलथापलथी नंतरही स्मिता वाघांनी विजयाचा झेंडा रोवला. मात्र, गेल्या वेळेस पेक्षा भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य घटलेले आहे. गेल्या वेळेस आकडा हा चार लाखापर्यंत गेला होता मात्र यावर्षी तो अडीच लाखाच्या आतच थांबलेला आहे. यामुळे जळगाव व रावेर दोन्ही लोकसभेच्या सीट साठी भाजपला चिंतन करावी लागणार असे दिसत आहेत.

पहिल्या फेरीपासूनच दोघांचीही आघाडी

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेमध्ये भाजपा विरुद्ध महायुती या दोघांमध्ये काट्याची टक्कर होणार असे चिन्ह दिसत होती. भाजपाने आपले दोघेही उमेदवार आधी जाहीर केलेले होते. यात रावेर लोकसभेमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर झाल्यामुळे अनेक अटकने लावण्यात आली होती. तसेच भाजपमधून उद्धव ठाकरे सेनेत गेलेले उन्मेष पाटील यांनी मित्र करण पवार यांना उमेदवारी देऊन एक नवीन आव्हान उभे केले होते. आज दि. 4 रोजी मतमोजणीला प्रारंभ झाल्या बरोबरच जळगाव व रावेर लोकसभेमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवलेली होती ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. यामध्ये रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतमोजणी थांबण्याचा अर्ज दिला होता त्यांनी कंट्रोल युनिट व वि वी पॅड यांच्या बॅटऱ्यांवर शंका उपस्थित केली होती. मात्र काही काळा नंतर ती मतमोजणी पुन्हा सुरू झाली.

रावेरमध्ये मराठा व मुस्लिम कार्ड ठरले फेल

रावेर लोकसभेमध्ये मराठा व मुस्लिम कार्ड सबसे फेल ठरलेला आहे. या ठिकाणी पुन्हा रावेर लोकसभेमधील मतदारांनी लेवा गुजर व इतर समाजाने खडसेंवर विश्वास दाखवीत तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना विजयाचा मान दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हाध्यक्ष अमोल जावळे समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पाया वर पाऊल ठेवत पक्षाचा आदेश मानत रक्षा खडसे यांच्या प्रचाराला प्रारंभ केला. खडसेंवर दाखवलेला विश्वास व त्यांना मिळालेली मतदारांमधून सहानुभूती त्यामुळे सुनबाई रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत.

चंद्रकांत पाटील यांना केले सहकार्य

रक्षा खडसे या विजयी झालेले असल्या तरी त्यांचे सासरे ही भाजपात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुक्ताईनगर हा रक्षा खडसे यांचा गड जरी असला मात्र विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील व खडसे परिवारातील वर संपूर्ण राज्याला माहिती आहे असे असतानाही युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी कट्टर विरोधक असलेल्या खडसे परिवाराच्या सुनबाईला खासदार बनविण्यात सहकार्य केले आहे.

अन् स्मिता वाघ यांनी विजयाचा पाया रोवला

पवारांच्या सभा रावेरमध्ये होऊनही पाहिजे तसा प्रभाव ते पाडू शकले नाही. ऐनवेळी उमेदवार दिल्याने पक्षातील लोकांनी कामे केली नाही. जळगाव लोकसभेमध्ये दोघेही मराठा कार्ड असल्यामुळे कोण बाजी मारणार यावर सर्व काही अवलंबून होते मात्र नामदार गिरीश महाजन यांच्या नियोजनामध्ये मंगेश चव्हाण यांनी केलेली तयारी व शिंदे शिवसेनेच्या पालकमंत्री व आमदारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून मिळून दिलेले मताधिक्य व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव आमदार असलेले अनिल पाटील यांचा मतदार संघातून मिळालेले मतदान यावर स्मिता वाघांनी आपला विजयाचा पाया रोवला.

श्रीराम पाटील यांनी मतमोजणी वेळी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळासाठी मतमोजणी थांबली मात्र त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरुवात झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news