Sindkhed Raja : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ऐतिहासिक गरुड मूर्तीचा शोध

शासकीय वाडा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाजवळ आणि पत्र्याच्या शेडलगत गरुड मूर्ती आढळून आली.
Sindkhed Raja
Sindkhed Raja : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ऐतिहासिक गरुड मूर्तीचा शोधfile photo
Published on
Updated on

Discovery of a historic Garuda statue from a garbage heap

सिंदखेड राजा, पुढारी वृत्तसेवा : शासकीय वाडा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाजवळ आणि पत्र्याच्या शेडलगत गरुड मूर्ती आढळून आली. ही मूर्ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. सध्या ती श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाड्यातील नगारखान्यात पर्यटकांना पाहता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

Sindkhed Raja
Buldhana News : दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये - पालकमंत्री मकरंद पाटील

सन २०२२ मध्ये इतिहास अभ्यासक व लेखक सुमित सुभाष खांदवे आणि मयुरेश अतुल खेकाळे यांनी मूर्तीचा शोध सुरू केला. मूर्तीच्या मूळ स्थानाचा शोध तसेच तिच्या ऐतिहासिक संदर्भाची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. पुढील अभ्यासानंतर ही मूर्ती ज्या विभागाच्या अखत्यारीत येते, त्या विभागाकडे ती सोपविण्यात येईल, अशी माहिती उपसंचालक मयुरेश खडके यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी अतुल खेकाळे, इतिहास अभ्यासक सुमित सुभाष खांदवे, रफीक सैय्यद, विजय सोनुने, डॉ. सुभाष खांदवे आदी उपस्थित होते.

Sindkhed Raja
Buldhana News : ‘आम्ही शेतकऱ्यांचीच मुले, त्यांचे दु:ख व नुकसान समजू शकतो!’ कृषीमंत्री भरणे

मुर्ती पुरातत्व विभागाकडे सुपूर्द

सापडलेल्या गरुड मूर्तीची उंची ३०.५ इंच, रुंदी १५ इंच आणि जाडी १० इंच आहे. मूर्तीची सुरक्षितता आणि पुढील अभ्यासाच्या दृष्टीने ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आली. विभागाचे उपसंचालक मयुरेश खडके यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना मूर्ती सुरक्षितपणे ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचारी धीरज हांडे यांनी मूर्ती ताब्यात घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news