Buldhana News : पिकाला 'तुषार'चा आधार; शेतकऱ्यांची चिंता वाढली

सोयाबीन फुलोऱ्यात; अल्प पावसामुळे उत्पादन घटण्याची भीती
sprinkler irrigation
Buldhana News : पिकाला 'तुषार'चा आधार; शेतकऱ्यांची चिंता वाढलीfile photo
Published on
Updated on

Crops rely on sprinkler irrigation; farmers' anxiety mounts

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील अंढेरा परिसरासह अनेक गावांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. विशेषतः सोयाबीन पीक सध्या फुलोरा व फळधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पाण्याची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विहीर व बोअरवेलची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचनाचा आधार घेत पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

sprinkler irrigation
Buldhana News | मेहकर ग्रामीण रूग्णालयाजवळ महिलेची रस्त्यावरच प्रसूती, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या 'होमटाऊन'मधील संतापजनक घटना

अंढेरा, पिंपरीआंधळे, बायगाव खुर्द, सावखेड नागरे, मेंडगाव तसेच मेहुणा राजा, टाकरखेड भागिले, नारायणखेड, सरंबा, देऊळगाव मही, पाडळी शिंदे, शिवनी आरमाळ, मंडपगाव, चिंचखेड आदी परिसरातील शिवारांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी अनेक भागांत पावसाअभावी पिके अडचणीत आली आहेत.

sprinkler irrigation
Buldhana Snakebite Death : झोळीतून मृत्यूशी झुंज ठरली अपयशी! रस्त्याअभावी बुलढाण्यात सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेचा दुर्दैवी अंत

सोयाबीन पिकाच्या मशागतीपासून कोळपणी, निंदणी, फवारणी यासह आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. एकरी सुमारे १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर आता पीक हातात येण्याच्या प्रतीक्षेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आसमानी संकटात सध्या शेतकरी सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news