Shegaon Shirdi Food Street Hub | श्रीक्षेत्र शेगाव, शिर्डी येथे आधुनिक ‘फूड स्ट्रीट हब’ उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी

भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध होणार
Gajanan Maharaj Shegaon Darshan News
Gajanan Maharaj Shegaon Darshan NewsPudhari
Published on
Updated on

Central Government Approval Food Streets Maharashtra

बुलढाणा : महाराष्ट्रातील दोन प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव आणि शिर्डी येथे आधुनिक ‘फूड स्ट्रीट हब’ उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असून, भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील १०० महत्त्वाच्या ठिकाणी ‘फूड स्ट्रीट’ योजना राबविण्यात येत आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांमुळे होणारे आजार आणि अन्न विषबाधा रोखण्यासाठी अन्न हाताळणीचे सुरक्षित निकष लागू करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने ही योजना कार्यान्वित केली जात आहे.

Gajanan Maharaj Shegaon Darshan News
Gajanan Maharaj Shegaon Darshan News | राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे 'शेगाव मंदिर' दर्शनाच्या वेळेत बदल ; जाणून घ्या दर्शनासाठी मंदिर कधी असणार खुले ?

या योजनेअंतर्गत शेगाव आणि शिर्डी येथे भाविकांसाठी आधुनिक, स्वच्छ आणि आरोग्यदायी फूड स्ट्रीट विकसित करण्यात येणार आहेत. शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना तसेच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दर्जेदार आणि पौष्टिक अन्नसेवा उपलब्ध होणार आहे.

यासोबतच स्थानिक लघु व्यावसायिक आणि खाद्य विक्रेत्यांच्या रोजगारालाही चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानांमध्ये शेगाव आणि शिर्डीचा समावेश होत असल्याने या दोन्ही ठिकाणी ‘फूड स्ट्रीट हब’ मंजूर केल्याबद्दल केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news