Buldhana Crime | रत्ने विकण्याचा व्हिडिओ दाखवून खरेदीसाठी गळ; एकाला मारहाण करून ५ लाखांला लुटले

बुलढाणा पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या ५ दरोडेखोरांच्या मुसक्या
 Buldhana Assault and Robbery Case
Buldhana Assault and Robbery CasePudhari
Published on
Updated on

Buldhana Assault and Robbery Case

बुलढाणा : रत्ने आणि सुलेमानी हकीक खड्यांच्या विक्रीचा आमिष दाखवत ग्राहकाला जाळ्यात ओढून त्याच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच दरोडेखोरांना अटक करून लुटलेला मुद्देमालही हस्तगत केला.

या प्रकरणात चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२, रा. शंकरनगर वसरणी, जि. नांदेड) यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, निलेश नरेश भोसले आणि जैकीचंद विरोधभाई पवार (दोघेही रा. साकेगाव, ता. चिखली) यांनी त्यांच्या ताब्यातील रत्न व सुलेमानी हकीक खड्यांचा व्हिडिओ पाठवून त्याला खरेदीसाठी आकर्षित केले. त्यानुसार, चिखली–देऊळगाव राजा मार्गावरील राजवाडा सराफी दुकानाजवळ येण्यास सांगण्यात आले.

 Buldhana Assault and Robbery Case
Buldhana Crime | पंजाबच्या 'हार्वेस्टर आपरेटर'चा खूनच झाल्याचे उघड, साखरखेर्डा पोलिसांनी सात तासात लावला छडा : एका संशयिताला अटक

शुक्रवारी (दि. १) सायंकाळी सुमारे ४ वाजता चंद्रशेखर स्वामी ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच आरोपी निलेश भोसले, जैकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराया पवार आणि त्यांच्या एका साथीदाराने त्याच्यावर हल्ला चढवला. चापट्या, बुक्के आणि काठीने मारहाण करत त्याच्याकडील सोने-चांदी व अष्टधातूचे दागिने तसेच २० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी फरार झाले.

तक्रार मिळताच एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर आणि अंढेरा पोलिसांचे एपीआय रूपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तात्काळ सक्रिय झाले. गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी निलेश भोसले साकेगाव येथे लपल्याचे निष्पन्न झाले, तर इतर आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

 Buldhana Assault and Robbery Case
Buldhana Crime : वांग्याच्या शेतात अफूचा 'मळा'; LCB चा छापा, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी साकेगाव येथे छापा टाकून निलेश भोसलेला अटक केली. दरम्यान, इतर आरोपींचा सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून त्यांना एका शेतात पकडण्यात आले. अटकेदरम्यान आरोपींकडून सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन कर्णफुले, सुमारे ४०० ग्रॅम चांदीचे कडे, चांदीचे ब्रेसलेट, अंगठी, चेन, राखी आणि ११ हजार रुपये रोख असा सुमारे ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या यशस्वी कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रूपेश शक्करगे, पीएसआय प्रताप बाजड, दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, मनोज खरडे, अमोल अंधारे, पूजा जाधव, विकास देशमुख आणि पीएसआय दिनेश घुगे यांच्या पथकाने तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत पाचही आरोपींना जेरबंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news