Buldhana Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

वाहनचालक पसार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Buldhana Accident News
ऋषीकेश गजानन भागीलेpudhari photo
Published on
Updated on

देऊळगाव राजा : जालना येथून दुचाकीने आपल्या गावी परतत असलेल्या २७ वर्षीय युवकाचा अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना असोला फाट्यावर नुकतीच घडली आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी युवकाला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषीकेश गजानन भागीले (२७, रा. टाकरखेड भागीले, ता. देऊळगाव राजा) हा शनिवारी (दि. २७) रात्री जालना येथून दुचाकीवरून (एमएच-२०-एपी-२५४५) आपल्या गावी परतत होता. रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या दरम्यान असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे येऊन त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Buldhana Accident News
Latur Accident: भरधाव क्रेटाची क्रूझरला पाठीमागून जोरदार धडक; तीन महिलांचा मृत्यू, 11 जण जखमी

या भीषण धडकेत ऋषीकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावसाहेब डोके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana Accident News
Parbhani Accident | कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news