Buldhana Crime | १६ लाखांच्या हरभऱ्यासह फरार ट्रक चालकासह पाच जण जेरबंद; १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुमारे २०० किलोमीटर परिसरातील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
Buldhana Truck Driver Arrested
ट्रकसह फरार झालेल्या चालकासह पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीPudhari
Published on
Updated on

Buldhana Truck Driver Arrested

बुलढाणा : शासकीय हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला सुमारे १६ लाख रुपये किमतीचा २७० क्विंटल हरभरा नियोजित ठिकाणी न पोहोचवता ट्रकसह फरार झालेल्या चालकासह पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून हरभरा विक्रीतून मिळालेले रोख तीन लाख रुपये, चोरीतील हरभरा आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुमारे २०० किलोमीटर परिसरातील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी ट्रक चालक शेख अमीन शेख जमील (वय ३३) हा मलकापूर शहरात असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली.

Buldhana Truck Driver Arrested
Buldhana Crime News : 'चिल्ड्रेन बँक'च्या नोटांनी फसवणूक करणारी टोळी जेरबंद; पोलिसांवर चाकू हल्ला

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख समीर शेख सलीम (२७), शेख सादिक शेख नुरमोहम्मद (२४), मोहम्मद मुस्तकिन मोहम्मद मुशीर शेख (३४) आणि सोहिलखान उर्फ शोएब युनुसखान (२३, सर्व रा. पारपेठ, मलकापूर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा हरभरा विकून मिळालेले तीन लाख रुपये हस्तगत केले. तसेच तेल्हारा (जि. अकोला) येथे जाऊन तपास पथकाने चोरीतील उर्वरित ११८ क्विंटल ३५ किलो हरभरा आणि गुन्ह्यात वापरलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला.

Buldhana Truck Driver Arrested
Buldhana Crime | वडील बेपत्ता झाल्याची तक्रार देणारा मुलगाच निघाला मारेकरी!

लाल माती किन्होळा (ता. मोताळा) येथील ‘नाफेड’च्या शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर हमीभावाने खरेदी करण्यात आलेला २७० क्विंटल हरभरा (किंमत १५ लाख ८६ हजार २५० रुपये) मलकापूर येथील वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचवण्यासाठी ९ मे रोजी ‘लकी ट्रान्सपोर्ट’च्या एमएच ४३-यू-५२९० क्रमांकाच्या ट्रकमधून पाठवण्यात आला होता. मात्र हा ट्रक नियोजित ठिकाणी पोहोचला नसल्याने संशय निर्माण झाला.

या प्रकरणी शेतमाल खरेदी केंद्राच्या वतीने राजेंद्र जगले यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ट्रक चालक शेख अमीन याने हरभरा मालाची परस्पर विल्हेवाट लावत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Buldhana Truck Driver Arrested
Buldhana Crime | बुलढाण्यात १६ लाखांच्या २७० क्विंटल हरबऱ्यांसह ट्रकचालक फरार

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अविनाश जायभाये तसेच पोलीस कर्मचारी दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आढाव, विजय पैठणे आणि गजानन गोरले यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news