बुलढाणा: हत्ता येथे शेतात छापा टाकून दीड कोटींचा गांजा जप्त

बुलढाणा: हत्ता येथे शेतात छापा टाकून दीड कोटींचा गांजा जप्त
Published on
Updated on

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: लोणार तालुक्यातील हत्ता गावातील एका शेतात तुरीच्या पिकामध्ये चोरटी लागवड केलेला सुमारे १ कोटी ४० लाखांचा १४ क्विंटल वजनाचा हिरवा गांजा जप्त केला. ही कारवाई आज (दि.१३) पहाटे एलसीबीच्या पथकाने केली. या प्रकरणी अनिल घुमा चव्हाण (वय ४५ रा. हत्ता ) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हत्ता (ता. लोणार) शिवारातील शेतमालक अनिल घुमा चव्हाण याने अवैध कमाईच्या हेतूने तीन एकर क्षेत्रावरील तूर पिकामध्ये गांजाची लागवड (मिश्र पिक) केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगणे, लोणारचे ठाणेदार निमिष मेहेत्रे, एपीआय सदानंद सोनकांबळे यांच्या पथकाने शेतात छापा टाकला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news