बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या | पुढारी

बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या

रेणाखळी, पुढारी वृत्तसेवा : रेणाखळी (ता. पाथरी) शिवारातील रामकिशन मदनराव गिरी यांच्या शेतात  गुलाब सदाशिव येले (रा.इसलवाडी, ता मोताळा, जि. बुलढाणा)  येथील मेंढपाळाने  मेंढ्या बसवल्या होत्या. परंंतु, रविवारी (दि.२६) रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या. तर ३ मेंढ्या  जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची रेणाखळी सज्जाचे तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचा 

Back to top button