Bhandara Crime | तुमसर शहरात धारदार शस्त्रासह चौघांना अटक

तुमसर पोलिसांची खापा चौक परिसरात पहाटेच्या सुमारास गस्त घालताना कारवाई
 Crime News
Crime News Pudhari file photo
Published on
Updated on

Sharp Weapons Seized Tumsar Police


भंडारा:
तुमसर शहरातील खापा चौक परिसरात पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना तुमसर पोलिसांनी एका संशयित कारची झडती घेऊन धारदार कोयत्यासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी ( दि. ११) पहाटे ३:३० च्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनचे पथक शनिवारी पहाटे खापा चौक आणि नागराज ढाब्या समोरील सर्विस रोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी पहाटे ३:०५ ते ३:४० च्या दरम्यान एक संशयित चारचाकी वाहन पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये एक लोखंडी धारदार कोयता आढळून आला.

 Crime News
Bhandara Crime : भंडाऱ्यात चोरांचा थरार! एकाच रात्री १४ दुकाने फोडली

पकडण्यात आलेले आरोपी परिसरातील विविध गावातील रहिवासी असून यामध्ये शुभम श्रीधर भुरे (वय २२, रा. इंदुरका), राकेश रामराव सेलोकर (वय २९, रा. शहापुर), राकेश धनराज कुंभलकर (वय २६, रा. लावेसर), देवेंद्र रवि साठवणे (वय १९, रा. पाचगाव) यांचा समावेश आहे.

शस्त्र बाळगण्याबाबत आरोपींकडे कोणताही वैध परवाना नव्हता. तसेच हे आरोपी एखादा गंभीर (दखलपात्र) गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी करत आहेत.

 Crime News
Bhandara Crime | पत्नीची छेड काढल्याच्या रागातून पतीने उचलले टोकाचे पाऊल

शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क असून, नागरिकांनी आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे तुमसरचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news