Bhandara Crime : भंडाऱ्यात चोरांचा थरार! एकाच रात्री १४ दुकाने फोडली

Robbery
Robbery Pudhari
Published on
Updated on

भंडारा : शहरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

चोरांनी शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक आणि शहीद स्मारक चौकातील दुकानांना लक्ष्य केले. त्यांनी फक्त रोख रकमेचा शोध घेतला. जिथे त्यांना रोख रक्कम सापडली नाही, तिथे ते रिकाम्या हाताने परतले. चोरांनी राजीव गांधी चौकातील एका बारमध्ये प्रवेश करून रोकड चोरली. तेथे ठेवलेल्या दारूला हात लावला नाही. चोरी झालेल्या दुकानांमध्ये आईस्क्रीम पार्लर, एअरटेल कार्यालय, अमृततुल्य टी, वृंदावन कॅफे आदी दुकानांचा समावेश होता. चोरांनी शटर तोडून रोकड घेऊन पळ काढला.

त्यानंतर चोरांनी भंडारा येथून जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला, जिथे त्यांनी चार दुकानांमध्ये चोरी केली. एकाच वेळी झालेल्या या चोºयांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या दुकानांवर मारला डल्ला

साठे चौक येथील अमृत अर्जुनभाई पोकार यांच्या चहाच्या दुकानाचे शटर तोडून सुमारे ५,००० रुपये चोरले. राजीव गांधी चौक येथील माँ भवानी हाईट्स इमारतीमधील मयूर खोब्रागडे यांच्या 'ग्रीन कॅफे' हॉटेलमधून १,५०० रुपये लांबवले. तापी चटर्जी यांच्या मेट्रो इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून २,००० रुपये चोरले. बेला येथील दिनेश साठवणे यांच्या 'दिनेश पान पॅलेस' मधून १,००० रुपये लंपास केले. मुस्लिम लायब्ररी चौक येथील फिर्यादीच्या दुकानाच्या परिसरातील इतर दुकानांमध्येही चोरट्यांनी हात साफ केला. अशा प्रकारे चोरट्यांनी एकूण १७,५०० रुपयांची रोकड लंपास केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news