Bhandara Crime | भंडारा हादरला : शिवी दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार; ५ मित्रांनी केला मित्राचा खून

साकोली येथील गडकुंभली मार्गावरील तलावाच्या काठावर एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Sakoli Friend Killed By Friends

भंडारा:
साकोली येथील गडकुंभली मार्गावरील तलावाच्या काठावर शुक्रवारी (ता. २२) एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला होता. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तपासाला गती दिली.  साकोली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील एक अल्पवयीन आहे.

आरोपींमध्ये गणेश मनोहर वलथरे (वय २०), सागर शंकर पारधी (वय १९), ओमकार सुनिल मेश्राम (वय २१) सर्व रा. शिवाजी वार्ड साकोली, कमलेश चुन्नीलाल कुकवास (वय २३, रा. मानेगाव ता. लाखनी) व एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

Crime News
Bhandara Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

निखिल राजकुमार कांबळे (वय ३०, रा. मुरपार (लेंडेझरी) ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया) या युवकाचा मृतदेह तलावाच्या काठावर आढळला होता. त्याची बॅग आणि दुचाकीसुद्धा त्याच ठिकाणी होती. त्याच्या छातीवर, मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या जखमा होत्या.

मृत निखिल आणि आरोपी हे एकमेकांचे जिवलग मित्र असून घटनेवेळी त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला होता. निखिलने केलेली शिवीगाळ आरोपींना सहन न झाल्याने त्यांनी निखिल कांबळे याचा खून करून पसार झाले होते. साकोली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजू साळवे हे करीत आहेत.

Crime News
Bhandara Accident : दुचाकी थेट झाडाला धडकली, वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सर्व आरोपींना अटक करण्यात अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिंचोवळकर, साकोलीचे पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू साळवे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत वडूले, नरेंद्र झलके, चंदू थेर, गाठबांधे, गणवीर, बागडे तथा साकोली पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाºयांनी परीश्रम घेतले.

बघ्यांच्या गर्दीत होता आरोपी

निखिलचा मृतदेह तलावाकाठी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पाहता पाहता घटनास्थळी गर्दी गोळा झाली. या गर्दीत एक आरोपीही उभा होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news