Bhandara Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

पिलांद्री येथील घटनेने खळबळ
Nagbhid  Tekari Tiger Attack Farmer killed
Tiger Attack Farmer killedPudhari
Published on
Updated on

Tiger Attack Farmer killed
भंडारा: जंगलात गवत आणायला गेलेल्या एका शेतक ऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत पिलांद्री जंगलशिवारात शुक्रवारी (दि.२२) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बाबुराव नत्थुजी पिल्लेवान (वय ५०, रा. कोदुर्ली ता. पवनी) असे मृताचे नाव आहे.

बाबुराव पिल्लेवान हे कोदुर्ली-पिलांद्री जंगल शिवारात गवत आणायला गेले होते. दरम्यान, दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ वन विभाग आणि अड्याळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.  

Nagbhid  Tekari Tiger Attack Farmer killed
Bhandara Accident : दुचाकी थेट झाडाला धडकली, वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर वाढला असून रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेकांना हा वाघ दिसल्याचे सांगितले जाते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. तरी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news