

भंडारा: जांभळी/खांबा परिसरातील सरकारी जागेत प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे पुतळा उभारणार्या ११ जणांविरुद्ध साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना २ फेब्रुवारी २०२५ ते २२ जून २०२५ या कालावधीत घडली.
फिर्यादी चंद्रहास रिमाचंद थेर यांच्या तक्रारीनुसार, छोटेलाल पटले, टेकराम बघेले, राजेश पारधी, मनोज पटले, विजय राणे, विनोद पटले, हेमराज रहांगडाले, खेमेन्द्र बघेले, हिवराज पटले, लिलाधर पटले आणि शुक्राचार्य पटले सर्व रा. जांभळी/खांबा यांनी पोलिसांनी दिलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक सरकारी आदेशांची अवहेलना केली. आरोपींनी गावाजवळील रस्त्यालगतच्या सरकारी जागेत राजाभोज यांचा पुतळा बेकायदेशीरपणे उभारून अतिक्रमण केले, व संबंधित जागेचे विद्रुपीकरण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रशासनाकडून यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिपक वानखेडे करीत आहेत.