भंडारा: अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला, २५ जण जखमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील एका महिलेच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर मध्यमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. मधमाशा लोकांवर तुटून पडताच मृतदेह स्मशानभूमीत ठेवून लोकांनी सैरावैरा पळत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. यात सुमारे २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच जखमींना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील अंजना मेश्राम या महिलेचे निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर कोदुर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार होते. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचताच मधमाशांनी लोकांवर हल्ला चढविला. मधमाशा तुटून पडताच लोकांनी मृतदेह स्मशानभूमीत ठेऊन जीव वाचविण्याच्या प्रयत्नात सैरावैरा पळाले. काही लोक गावाच्या दिशेने तर काहींनी तणशीच्या ढिगात आश्रय घेतला. यात २५ ते ३० लोक जखमी झाले.

यावेळी पोलिस ठाणे तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला फोन करुन बोलविले. अग्निशमन गाडी तिथे पोहोचली. परंतु, मधमाशांच्या हल्ल्याला परतून लावणे किंवा मधमाशा असतांनाही अग्नि संस्कार कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य हेलमेट, जॉकेट उपलब्ध नसल्यामुळे, अग्निशमन गाडी आल्यापावली परतली. काही वेळेनंतर अंजना मेश्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news