भंडारा: राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजपाचा कॉंग्रेसकडून निषेध

भंडारा: राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजपाचा कॉंग्रेसकडून निषेध

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला.

२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वाऱ्यावर  सोडून दिले असून ते आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करत आहेत. मोदी सरकार या देशातील गोरगरिब, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप यावेळी बोलताना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केला.

यावेळी जयश्री बोरकर,शफी लद्दानी, जि. प. सभापती रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, अमर रगडे, शमीम शेख, बाला ठाकुर, राजकपूर राऊत, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष  चंद्रकांत निंबार्ते आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news