भंडारा : बिबट्याच्या हल्ल्यात 600 कोंबड्या ठार

अड्याळ वनक्षेत्रातील घटना
600 chickens killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात 600 कोंबड्या ठार Pudhari File Photo
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : अड्याळ वनपरिक्षेत्र अंतर्गत केसलवाडा हद्दीतील तेलपेंढरीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये शिरून बिबट्याने तब्बल 600 कोंबड्या ठार केल्याची घटना बुधवारी (दि.18) मध्यरात्री घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. तर बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावला आहे.

600 chickens killed in leopard attack
छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्या आल्याची अफवा

केसलवाडा येथील नागसेन मारोती रामटेके यांच्या सुमन पोल्ट्री फॉर्ममध्ये बिबट्याने जाळीचा दरवाजा तोडून बुधवारी मध्य आत प्रवेश केला. बिबट्याने हल्ला करताच कोंबड्या सैरावैरा एकमेकांवर उड्या मारू लागल्या. या हल्ल्यात तब्बल 600 कोंबड्यांचा जीव घेतल्याने पशुपालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

600 chickens killed in leopard attack
Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..

ही घटना गुरुवारी (दि.18) उघडकीस येताच वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे , वनरक्षक निलेश श्रीरामें, संदीप भुसारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. या तपासात तिथे एक लहान व मोठा असे बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावून परिस्थितीवर लक्ष्य ठेऊन आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news