छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्या आल्याची अफवा

नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन
leopard
बिबट्या file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्का नगरी भागात बिबट्या आल्याची अफवा सोमवारी सकाळपासून पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून कुठल्याही पाऊलखुणा नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

leopard
Maratha Reservation : जरांगेंचे २० जुलैपासून पुन्हा उपोषण!

आज सकाळी सोशल मीडियावर बिबट्याचे फोटो व्हायरल झाले होते. सदर परिसर शहरातील असल्याचे नागरिकांना वाटल्याने काही वेळातच अफवा पसरून नागरिकांमध्ये भीती पसरली होती. मुख्य वन संरक्षक दादासाहेब तौर यांनी सदर घटनेचा स्पष्ट नकार दिला असून शहराच्या कोणत्याही भागात बिबट्या आढळून आला नसल्याची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आपली कामे सुरळीत चालू ठेवावीत असे आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news