भंडारा: तरुणीवर अत्याचार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल

भंडारा: तरुणीवर अत्याचार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: प्रेमाचे नाटक करुन तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर इंस्टाग्रामवर बनावट अकांऊट तयार करुन तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केले. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन अड्याळ पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार पवनी तालुक्यात उघडकीस आला.

केशव दिलीप वैद्य ( वय २५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या आरोपीने पवनी तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीशी एप्रिल २०२१ पासून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. त्यानंतर इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्या तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केले.

याप्रकरणी तरुणीने अड्याळ पोलिसांत तक्रार दाखल केली. अड्याळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी आरोपी केशव वैद्यविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पवनीचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news