

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज ( दि. ६) सुरक्षा दल आणि दहशवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश आले.
सोमवारी (दि. ५) रात्री अनंतनागमधील इमामसाहिब पसिरातील एसओजी छावणीवर दहशवताद्यांनी हल्ला केला. या छावणीवर अंदाधूद गोळीबार करण्यात आला. यावेळी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र अंधाराचा फायदा घेवून दशतवादी पसार झाले होते.
आज सकाळी पोशक्रीरि परिसरात नाकाबंदी करण्यात आली. शोध मोहिम राबविण्यात आली. या वेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. दुपारपर्यंत या परिसरात चकमक सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी सांगितले. या चकमकीबाबत काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली. दानिश भट उर्फ कोकब दुरी आणि बशारत नबी अशी चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असून, हे दोघे एक पोलीस कर्मचारी आणि दोन नागरिकांच्या हत्यामध्ये सहभागी होते.
हेही वाचा :