भंडारा : तुमसर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरची परिचरला ब्रदर्सला अमानुष मारहाण

भंडारा : तुमसर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरची परिचरला  ब्रदर्सला अमानुष मारहाण
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या परिचराला चक्क वैद्यकीय अधिकाऱ्याने काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गोमा उईके (वय ५२) असे गंभीर जखमी परिचराचे नाव आहे. तर डॉ. सागर दिलीप कडसकर (वय २९) असे मारहाण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नांव असून तो फरार झाला आहे.

मंगळवारी परिचर नारायण उईके हे प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान कर्तव्यावर गेले. तेव्हा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांनी त्यांना 'तू ड्युटी बरोबर करीत नाही' असे म्हणत आपल्या जवळ बोलविले. व तिथे उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सदर प्रकार गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. परिचराला डॉक्टरने केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. परिचर उईके यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर उईके यांनी उशिरा रात्री गोबरवाही पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कडसकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आदिवासी संघटना एकवटल्या

संपूर्ण जिल्ह्यात हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. त्या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटना एकवटल्या आहेत. एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्याच आरोग्य केंद्रातील परिचराला काठी व लाथांनी अमानुषपणे मारहाण करणे अशोभनीय आहे. त्यामुळे त्या दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी बांधवांनी गोबरवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक पाटील यांच्यामार्फत वरिष्ठांना दिले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप

वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य कर्मचाºयाला केलेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर कर्मचाºयाला न्याय मिळावा तसेच वैद्यकीय अधिकाºयावर कारवाई करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news