Melghat Wildlife | मेळघाटातील पहिलीच घटना: लांडगा-रानकुत्रा सहजीवनाचे दुर्मिळ दर्शन

आंतरप्रजाती सहजीवनाची दुर्मिळ नोंद, कळपाच्या अग्रस्थानी प्रौढ लांडगा
Melghat Rare Wildlife Sighting
Indian Wolf, Indian Wild DogPudhari
Published on
Updated on

Melghat Rare Wildlife Sighting

अमरावती : वन्यजीव अभ्यासकांनाही थक्क करणारा प्रसंग मेळघाटच्या जंगलात नोंदवला गेला आहे. सहसा वेगवेगळ्या अधिवासात आढळणारे भारतीय राखाडी लांडगा आणि ढोल (आशियाई रानकुत्रा) हे दोन ‘कॅनिड’ प्राणी एकत्र, तेही पूर्ण शांततेत फिरताना दिसले. विशेष म्हणजे या गटाचे नेतृत्व एका प्रौढ लांडग्याकडे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रात ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख यांनी भारतीय राखाडी लांडगा आणि चार ढोल यांचा समन्वयाने फिरणारा गट जवळपास ४० मिनिटे पाहिला. या काळात कोणतीही गुरगुर, झेप किंवा वर्चस्वासाठी संघर्षाचे संकेत आढळले नाहीत.

Melghat Rare Wildlife Sighting
Kirit Somaiya Amravati News | किरीट सोमय्यांच्या बैठकीवरून अमरावतीत राजकारण तापले; बबलू शेखावत यांनी आयुक्तांना मागितला खुलासा

लांडगा प्रामुख्याने मोकळी गवताळ कुरणे, शुष्क माळराने व कृषी-पशुपालक भागात आढळतो; तर ढोल दाट पानझडी व सदाहरित जंगलात कळपाने वास्तव्य करतो. त्यामुळे या दोन मोठ्या सामाजिक ‘कॅनिड’ प्रजातींचा असा मैत्रीपूर्ण सहवास दुर्मीळ मानला जातो. भारतीय वन्यजीव अभ्यासात ही केवळ तिसरी नोंद असल्याचे सांगितले जाते. मेळघाटात मात्र ही पहिलीच घटना ठरली आहे.

निरीक्षणातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे प्रौढ लांडगा गटाच्या अग्रभागी राहून हालचालींना दिशा देत असल्याचे स्पष्ट दिसले. ढोलांच्या कळपात ठरावीक सामाजिक शिस्त असते; अशा वेळी दुसर्‍या प्रजातीचा सदस्य पुढे असणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. डॉ. देशमुख यांनी या घटनेची सविस्तर नोंद ठेवली असून तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे.

Melghat Rare Wildlife Sighting
Amravati News | अचलपूर नगराध्यक्षांची युतीबाबत सारवासारव : पालकमंत्र्यांना पत्र लिहून एमआयएमसोबत युती नसल्याचे स्पष्टीकरण 

आंतरप्रजाती वर्तन, अधिवासातील बदल आणि पर्यावरणीय दडपण या संदर्भात ही घटना नवे प्रश्न उपस्थित करते. या निरीक्षणावर आधारित संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध करण्याची तयारीही सुरू आहे.

मेळघाटच्या समृद्ध जैवविविधतेतून समोर आलेली ही घटना केवळ ‘अनोखी जोडी’ नसून, परिसंस्थेतील संतुलन आणि सहअस्तित्वाची जिवंत साक्ष ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news