Amravati News | अचलपूर नगराध्यक्षांची युतीबाबत सारवासारव : पालकमंत्र्यांना पत्र लिहून एमआयएमसोबत युती नसल्याचे स्पष्टीकरण 

युती झाल्याच्या मीडियावरील बातम्या पूर्णतः खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या असल्याचा दावा
Amravati News
Amravati News
Published on
Updated on

अमरावती : भारतीय जनता पार्टी पक्ष हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष असून एआयएमआयएम सोबत कोणत्याही प्रकारची युती भाजपाने अचलपूरमध्ये केलेली नाही, अशी भूमिका अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी पालकमंत्र्यांना पत्र लिहून (दि.२२) मांडली आहे.

अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एआयएमआयएम यांच्यात युती झाल्याच्या मीडियावरील बातम्या पूर्णतः खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या असल्याचेही नगराध्यक्षा रूपाली माथने म्हणाल्या आहेत. त्यांनी याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत अचलपूर नगर परिषदेत एआयएमआयएम पक्षाचा कोणताही अधिकृत गट अस्तित्वात नसल्याचा दावा केला आहे.

भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष असून एआयएमआयएम सोबत कोणत्याही प्रकारची युती भाजपाने केलेली नाही. नगर परिषदेमध्ये एआयएमएमचा स्वतंत्र गट नसताना अशा अफवा पसरवणे हे चुकीचे आहे असेही रूपाली माथने यांनी पत्रात नमूद केले आहे.

Amravati News
Amravati Crime | स्वयंपाक बनवण्यावरून दारूच्या नशेत राफ्टर डोक्यात घालून मित्राचा खून

अचलपूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत भाजपने वेगळी रणनीती आखली. विविध विषय समित्यांचे सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यात भाजपला यशही आले. या मतैक्याचा फायदा एमआयएमलाही झाला आणि एक सभापतीपद या पक्षाच्या वाट्याला आले. त्यामुळे भाजप व एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या.

अचलपूर नप मधील समीकरण - 

अचलपूर नगर परिषदेत काँग्रेसचे सर्वाधीक १५, एआयएआयएमचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि १ अपक्ष असे एकूण २१ नगरसेवक आहेत. तसेच प्रहार पक्षाचे दोन नगरसेवक भाजपाचे १० आणि ८ अपक्ष नगरसेवक असून विविध आघाड्यांचे गट कार्यरत आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडी अचलपूर विकास आघाडी अचलपूर परतवाडा विकास आघाडी आणि भाजपाचा स्वतंत्र गट अस्तित्वात असल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

एमआयएमचा गटच अस्तित्वात नाही-

अचलपूर नगरपालिकेत एमआयएमचा गटच अस्तित्वात नाही. अचलपूर मध्ये काँग्रेसचे १५, भाजपचे अपक्ष मिळून १०, अचलपूर विकास आघाडीचे ८ आणि अपक्ष ८ असे मिळून ४१ जणांचे गटनिहाय बलाबल आहे. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आम्ही एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही. या ठिकाणी एमआयएमचा गटच नसल्याने युतीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपचे अचलपूर येथील नेते अभय माथने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news