आधी वाहनाची ठोकर, नंतर सपासप वार; भावाच्या वाढदिवसाला तरुणाचा निर्घृण खून

अमरावतीतील केडिया नगरात धक्कादायक प्रकार
Amravati  Crime News
अमरावतीतील केडिया नगरात तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.File Photo

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यावरून आलेल्या एका तरुणाचा अमरावतीत केडिया नगरातील बगीच्या जवळ निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.१८) रात्री बाराच्या दरम्यान घडली. रोहित मांडळे (वय २४, रा. राजापेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Amravati  Crime News
अमरावती : सिटी बसची आजी-नातवंडांना धडक, चिमुकल्याचा चिरडून मृत्यू

जुन्या वादातून रोहितवर हल्ला करून हत्या

गुरुवारी रोहित भावाच्या वाढदिवसासाठी अमरावतीत दाखल होताच संशयित तरुणांनी आधी त्याला एका वाहनाने जोरदार धडक दिली आणि नंतर खाली उतरून त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा जागीच मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी संशयित असलेल्या चार युवकांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून रोहितवर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

Amravati  Crime News
अमरावती : कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

वाहनाने ठोकर देऊन रोहितवर सपासप वार

माहितीनुसार मृत रोहित हा पुणे येथे कार्यरत होता. त्याचा भाऊ नयन याचा वाढदिवस असल्याने तो अमरावतीत आला होता. वाढदिवसासाठी त्याच्या भावाचे आणि रोहितचे 30 ते 40 मित्र एकत्र बगीच्यात जमले होते. त्यांनी केक देखील आणला होता. दरम्यान रोहित हा फोनवर बोलताना बगीच्या बाहेर आला असता त्याला अज्ञात आरोपींनी आधी वाहनाने धडक दिली. धडकेत तो खाली कोसळताच त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितला जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तबंबाळ अवस्थेत दाखल करण्यात आले. तेथेच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news