अमरावती : सिटी बसची आजी-नातवंडांना धडक, चिमुकल्याचा चिरडून मृत्यू

अमरावती : सिटी बसने चौघांना चिरडले, चिमुकल्याचा मृत्यू
Amravati: City bus crushes four, one 9 years old boy dies
अमरावती : सिटी बसने चौघांना चिरडले, चिमुकल्याचा मृत्यू Pudhari Photo

अमरावती, पुढारी वृत्तसेवा

शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना आज (रविवार) घडली. यामध्ये एका (९ वर्षीय) मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आजी आणि दोन नातवंडांचा समावेश आहे. शहरातील सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने सिटी बसची तोडफोड केली. जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Amravati: City bus crushes four, one 9 years old boy dies
ठाकुरबुवा समाधी मंदिर येथे माऊलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात संपन्न

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव येथील आजी आणि तीन नातवंडे आज (रविवार) अमरावतीत काही कामानिमित्त आले होते. दरम्यान सायन्स कोर मैदानाजवळ भरधाव येणाऱ्या शहरातील स्टार सिटी बस क्रमांक एम एच 27 ए 9952 ने आजी आणि नातवंडांना धडक दिली. यातच एका नववर्षीय चिमुकल्याचा मृत्‍यू झाला, तर आजीसह दोन नातवंडे गंभीर आहेत.

Amravati: City bus crushes four, one 9 years old boy dies
आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके यांचे नागपुरात जल्‍लोषात स्‍वागत

या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी बस चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले असून बस जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अचानक सिटी बसचे ब्रेक फेल झाले आणि त्यामुळेच हा अपघात झाला असे देखील सांगितले जात आहे. पोलीस तपासातच या अपघातातील खरे कारण समोर येणार आहे. दरम्यान अपघातातील मृत आणि जखमींची नावे कळू शकली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news