अमरावती : कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

पत्नी अपमान करून शिवीगाळ करायची म्हणून काढला कायमचा काटा
Husband arrested in case of wife's murder
घरगुती कारणावरून पतीने पत्नीचा खून केला.File Photo
Published on
Updated on

अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्यात येणाऱ्या एकलविहीर येथील महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले. नीला धुर्वे (वय ५२, रा. एकलविहीर) असे या खून झालेल्या महिलेचे नाव असून पतीनेच जंगलात कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शालिकराम धुर्वे (वय ५५, रा.एकलविहीर) याला शुक्रवारी (दि.१२) अटक केली.

Husband arrested in case of wife's murder
छत्रपती संभाजीनगर : वडगाव येथे दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून

याबाबत अधिक माहिती अशी, निला व शालिकराम या पती - पत्नीचे घरगुती कारणावरून नेहमी वाद व्हायचे. पत्नी नीला नेहमी पतीचा अपमान करून शिवीगाळ करायची. घटनेच्या दोन दिवस आधी देखील पती आणि पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे पतीने नेहमीच्या वादातून व अपमानातून सुटका मिळावी, म्हणून तिचा जंगलात नेऊन घात केला. ९ जुलै रोजी सायंकाळी जनावरे चारण्यासाठी पत्नी नीला ही जंगलात गेली असता आरोपी पतीने संधी साधून आधी तिचा गळा दाबला आणि तिला बेशुद्ध केले. नंतर कुऱ्हाडीने तिच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये, म्हणून पत्नी कुठेच दिसत नसल्याचा त्याने बनाव करून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चौकशीसाठी पतीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली. या प्रकरणाचा उलगडा झाला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनातील पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news