Bachchu Kadu: धक्कादायक! बच्चू कडूंवर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bachchu Kadu Case: भाजप आमदाराच्या भावाची तक्रार
Bachchu Kadu
Bachchu Kadupudhari
Published on
Updated on

Bachchu Kadu : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bachchu Kadu
Amaravti fraud case | साबण तयार करण्यासाठी कच्च्या तेलाचा टँकर देण्याच्या नावावर ८ लाखांची फसवणूक!

भाजप आमदाराच्या भावाकडून तक्रार

अचलपूर मतदार संघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या एका साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिजीत दिवाकरराव तायडे वर वर्षी ४० यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या कटात शुभम उर्फ गोलू माहोरे यांचा देखील समावेश असल्याची तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, मोबाईल संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील तक्रारदाराकडून पोलिसात पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे.

Bachchu Kadu
Jalgaon theft news | जळगाव, चाळीसगावात चोरट्यांचा अक्षरशः 'राडा'; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुरावे सादर

रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. चांदूर बाजार पोलिसांनी BNS कलम 55, 58, 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Bachchu Kadu
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, पोलिसांनी हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढचा तपास हा चांदूर बाजार पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणात थेट बच्चू कडू यांचे नाव आल्यानं खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news