Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन गुन्हे उघड, पोलिसांच्या कारवाईने चोरट्यात दहशत
Samruddhi Expressway
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी, सात लाखांचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on
Updated on

Diesel Theft on Samruddhi Expressway; Goods Worth ₹7 Lakhs Seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीविरोधात जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे ७लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Samruddhi Expressway
Dharashiv Crime | शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन: गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; ५.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्तीसगड येथून ट्रक घेऊन आलेल्या धर्मेंद्र कुमार वर्मा यांनी त्यांच्या ट्रकमधून २०० लिटर डिझेल रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याची तक्रार २४ मार्च रोजी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी संतोष ऊर्फ संतोष आबासाहेब वाघमारे (रा. हडपसळ, ता. जाफराबाद) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची स्कॉर्पीओ (क्र. एम एच ४५ ९७९७) जप्त केली आहे.

या टोळीने केलेले इतर गुन्हेही उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयराज बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोप-अनंत ाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

Samruddhi Expressway
Nanded bike theft case : नांदेडमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुले ताब्यात

तपास सुरू

या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यासह जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news