Amravati Crime| अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद दोघांचा गोंधळ; डॉक्टरांवर दगडफेकीचा प्रयत्न

Attack on Doctors Anjangaon Surji | रुग्णालयातील सुरक्षारक्षक व कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला
Anjangaon Surji Rural Hospital
Anjangaon Surji Rural Hospital Pudhari
Published on
Updated on

Anjangaon Surji Rural Hospital Attack on Doctors

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद दोघांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामात अडथळा निर्माण करत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) घडली. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वेळीच रुग्णालयातील सुरक्षारक्षक व कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे की, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सुमारे २ वाजताच्या सुमारास सुनील प्रल्हादराव सदार (वय ५३, रा. जोळ-जवळा, ता. अंजनगाव सुर्जी) व रवींद्र पद्माकर घेंबळ (वय ५४, रा. भुगाव, ता. अचलपूर) हे दोघे मद्यधुंद अवस्थेत ओपीडीची चिट्ठी काढण्यासाठी आले. त्यावेळी रुग्णालयाची वेळ संपलेली असतानाही त्यांनी दवाखाना बंद का आहे, असे विचारले.

Anjangaon Surji Rural Hospital
Amravati crime | जिल्ह्यात संघटित गोतस्करी टोळ्या सक्रिय; खासदाराचे पोलिस अधीक्षकांना पत्र

त्यानंतर डॉ. तरुण पटेल यांना शिवीगाळ करून मारायला हातात दगड उचलून वैद्यकीय अधिकार्‍यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. डॉक्टरांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संतापून दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित सुरक्षारक्षक व रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व डॉक्टरांचा बचाव केला.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोघांना ताब्यात घेतले. उपस्थित डॉ. तरुण पटेल वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे.

Anjangaon Surji Rural Hospital
Amravati Crime : विषारी पाणी प्यायल्याने ५१ बकर्‍यांचा तडफडून मृत्यू

या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास अंजनगाव पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news