Amravati Teachers Constituency Election : महायुतीत देशपांडेंचे बंडखोरीचे संकेत, काँग्रेसकडून प्रा. अदिती पोहरे रिंगणात

प्रा. अदिती पोहरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Amravati Teachers Constituency Election
Amravati Teachers Constituency Electionpudhari
Published on: 
Updated on: 

Congress Aditi Pohre

राजरत्न मोटघरे

अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून एकीकडे महायुतीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे महायुतीपूर्वीच काँग्रेसने आपली उमेदवारी निश्चित करत आघाडी घेतली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेना (शिंदे गट) सोडली जाण्याचे संकेत मिळताच पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, महायुतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (दि. १) पक्षाकडून एक आणि अपक्ष म्हणून एक, असे दोन नामनिर्देशन अर्ज दाखल करून महायुतीत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

Amravati Teachers Constituency Election
Amravati Crime | खिडकीतून पेट्रोल टाकून लावली आग; पत्नी, मुलांना जिवंत जाळण्याचा पतीचा प्रयत्न

१९९२ पासून शिवसेनेत कार्यरत असल्याचे सांगत देशपांडे म्हणाले, तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी मी शिक्षक आघाडीच्या बॅनरखाली ही निवडणूक लढवणारच आहे. दुसरीकडे भाजपकडून खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर हेदेखील इच्छुक असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

प्रा. अदिती पोहरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महायुतीचा पेच सुरू असतानाच काँग्रेसने मात्र आपला उमेदवार निश्चित केला आहे. प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Amravati Teachers Constituency Election
Amravati Crime : अमरावतीत भरचौकात थरार: नागपुरातील इसमाची दोन अल्पवयीनांकडून निर्घृण हत्या; दोघेही ताब्यात

पक्षप्रवेशापाठोपाठ यशोमती ठाकूर यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. अदिती पोहरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आदिती पोहरे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या तथा देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत.

विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांत पसरलेल्या या मतदारसंघात २३ऑक्टोबर रोजी निवडणुक होते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news